कोल्हापूर : हुमणी नियंत्रणासाठी डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातर्फे शेतकरी मेळावा

कोल्हापूर : तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्यावतीने वडणगे (ता. करवीर) येथे शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यामध्ये कृषी विषयाशी संबंधित २० स्टॉल उभारले होते. या स्टॉलद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषिपूरक उद्योग, जैविक उत्पादने, कृषी मोबाईल अॅप्स तसेच विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. मेळाव्यास परिसरातील सुमारे ४०० शेतकरी उपस्थित होते. सर्व कृषिदूत व कृषिकन्यांनी मेळाव्याचे नियोजन केले. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हुमणी किडीचा कसा बंदोबस्त करता येईल व प्रकाश सापळ्यांचा वापर, जैविक व रासायनिक उपाय आदी बाबींवर यात विशेष भर देण्यात आला.

निवृत्त प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते म्हणाले की, ‘पिकांच्या मुळांवर प्रादुर्भाव करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करणाऱ्या हुमणी किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे, मोहिते यांनी हुमणी किडीची ओळख, जीवनचक्र, प्रादुर्भावाची लक्षणे तसेच नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य बी. एच. पाटील, महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी प्रा. आर. आर. पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. वाय. व्ही. पाटील. प्रा. ओ. व्ही. बेंद्रे व प्रा. श्वेता मयेकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. एस. एम. घोलपे यांनी प्रास्ताविक केले. योगिता रणणवरे हिने सूत्रसंचालन केले. डॉ. एस. आर. पाटील यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here