सातारा : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेतून पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते धनादेश व गटई कामगारांना स्टॉलचे वाटप करण्यात आले. एकूण १३१ लाभार्थी मंजूर असून, महामंडळाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार १५ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सानुग्रह अनुदानाची रक्क्म ऑनलाइनद्वारे जमा करण्यात आली, अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना पत्र्याचे गटई स्टॉल व स्टॉलवर प्रती लाभार्थी कमाल पाच हजार रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे वितरीत करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या हा कार्यक्रम झाला.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेतून लाभार्थ्यांना मदतीचे वितरण करण्यात येते. त्याचा प्रातिनिधीक कार्यक्रम झाला. त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, खासदार उदयनराजे भोसले, नितीन पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार धैर्यशील कदम, महेश शिंदे, डॉ. अतुल भोसले, सचिन पाटील, मनोज घोरपडे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, मुख्याधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव आदी उपस्थित होते.


















