छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ कारखान्याकडील थकीत बिलांसाठी ‘स्वाभिमानी’चे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची रक्कम थकीत आहे. आर्थिक अडचणी तीव्र झाल्यामुळे आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. ऊस बिल न मिळाल्याने कर्जाचे हप्ते भरणे, शेतीसाठी आवश्यक खर्च करणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन सुरू राहील,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माउली मुळे यांनी दिला. कारखान्याकडील थकीत ऊस बिलाची रक्कम अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाइल’ आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, सकाळी सहाला कार्यकर्ते व शेतकरी निषेध व्यक्त करण्यासाठी टाकीवर चढले होते. थकीत ऊस बिलाची संपूर्ण रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली. नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांनी सांगितले की, आगामी सात दिवसांत सहसंचालकांना (साखर) याबाबत वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जाईल, असे तहसीलदार म्हणाले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here