सांगली : राजारामबापू कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल शाखेत आगामी २०२६-२७ गळीत हंगामाचा रोलर पूजन

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल शाखेमध्ये आगामी २०२६-२७ गळीत हंगामाचा रोलर पूजन समारंभ मोठ्या उत्साहात झाला. यावेळी कारखान्याचे संचालक अतुल पाटील प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, संचालक शैलेश पाटील, प्रताप पाटील, राजकुमार कांबळे, हणमंत माळी, अमरसिंह साळुंखे, दिलीपराव देसाई, रामराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कारखान्याच्या कारंदवाडी युनिटमध्ये संचालक वैभव रकटे, तिप्पेहळळी युनिटमध्ये संचालक रमेश हाके यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात आले. यावेळी संचालक विठ्ठल पाटील, प्रदिपकुमार पाटील, रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, दादासाहेब मोरे, सचिव डी. एम. पाटील, प्रशांत पाटील, संग्राम चव्हाण, उमेश शेटे, प्रतिक मोरे, नंदकिशोर जगताप, सागर लड्ढे प्रामुख्याने उपस्थित होते.

वाटेगाव सुरुल येथील कार्यक्रमात संचालक अतुल पाटील म्हणाले की, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांची दूरदृष्टी आणि अथक परिश्रमातून वाटेगाव-सुरुल शाखेची उभारणी झाली आहे. वाटेगाव-सुरुल शाखा ही देशाच्या सहकार क्षेत्रातील पहिली ऐतिहासिक शाखा आहे. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वाटेगाव-सुरुल शाखेत पूर्ण कार्यक्षमतेने ऊसाचे गाळप करू. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले की, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांचे कुशल मार्गदर्शन, साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. कार्यकारी संचालक विजयराव मोरे, जनरल मॅनेजर संदीप पाटील, कामगार युनियनचे कार्याध्यक्ष तानाजी खराडे, कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख, चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण, चीफ केमिस्ट संभाजी सावंत, स्टोअर कीपर संभाजी खोत उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here