धाराशिव : पावसाअभावी उसासह खरीप पिके धोक्यात; शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

धाराशिव : लोहारा तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीसंदर्भात गंभीर संकट निर्माण झाले आहे. जुलै महिन्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. मात्र, त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने शिवारातील ऊस अक्षरशः वाळू लागला आहे. उसाची पाने पिवळी पडून करपून जाण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी वाढ पूर्णपणे खुंटली आहे. यामुळे यंदा उसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यात यावर्षी एकूण ३ हजार ८५५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पूर्व हंगामी ५२० हेक्टर, सुरू हंगामी १ हजार ५०३ हेक्टर व खोडवा १ हजार ८३२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. पुरेशा पावसाअभावी सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतांमधील उसाला सर्वाधिक झळ बसत आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या आहेत. मात्र, पावसाने साथ न दिल्याने उगवलेली रोपेही बाळू लागली आहेत. ऊस आणि खरीप अशी दोन्ही पिके धोक्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here