लातूर : शेतकऱ्यांना दिलासा, निळकंठेश्वर कारखान्याकडून ऊस बिलाचा दुसरा हप्ता अदा

लातूर : आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला श्री निळकंठेश्वर साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे औसा परिसरातील ऊस उत्पादकांना हक्काचा साखर कारखाना उपलब्ध झाला. कारखान्याकडून ऊस बिलाचा मोबदला देण्यासाठी सातत्याने पुढाकार घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. कारखान्याने या गळीत हंगामामध्ये ऊस गाळपास पाठवलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी प्रतिटन १०० रुपये अदा केले आहेत. एकूण २ कोटी ६९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत.

सध्याच्या परिस्थितीत खरीप हंगामातील पेरणीच्या तोंडावर ऊसबिलाची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने बियाणे, खते, औषधे आणि इतर शेतीकामांसाठी आर्थिक मदत मिळाली असून, शेतकऱ्यांना मोठा मिळाल्याची भावना ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे. परिसरातील असंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा तालुक्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. अशा स्थितीत कारखान्याकडून आधार भविष्यातही शेतकरी हिताला प्राधान्य देत ऊसबिलाचे हप्ते वेळेत अदा करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here