श्री शंकर कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य: चेअरमन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील

सोलापूर : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखाना स्थळावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले कि, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासद, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आगामी हंगाम यशस्वी करण्यासाठी अधिकारी, कामगार आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी व्हा. चेअरमन अॅड. मिलिंद कुलकर्णी, जि. प. सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, युवा नेते विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, अॅड. नितीन खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष देवीदास ढोपे, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, सरपंच वीरकुमार दोशी, माजी उपसरपंच उदय धाईंजे, विष्णू भोंगळे, शिवराज निंबाळकर, एकनाथ वाघमोडे, सतिश फडतरे, शेतकरी संघटनेचे दत्ता भोसले, संतोष शिंदे, माऊली निंबाळकर, बलभिम निंबाळकर, बबन भुजबळ, तुकाराम चव्हाण, जगनाथ जाधव, सागर उरवणे उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक अभिजित डुबल, जनरल मॅनेजर रविराज जगताप,चिफ इंजिनिअर समाधान कागदे, चीफ केमिस्ट अभिजित माने, शेतकी अधिकारी आनंदराव गायकवाड, डिस्टलरी मॅनेजर संजय मोरे, डेप्युटी चिफ इंजिनिअर निलेश जाधव, लेबरऑफिसर कैलास कदम, सिव्हिल इंजिनिअर राहुल मगर, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार, परचेस ऑफीसर उत्तम सपकाळ, लिगल ऑफीसर पंकज फडतरे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here