लातूर : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टचा मांजरा साखर कारखान्यास पुरस्कार जाहीर, हार्वेस्टरद्वारे १०० टक्के उसतोड करणारा मांजरा कारखाना देशात अव्वल

लातूर : राज्यात सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत अव्वल स्थानी असलेल्या लातूरच्या विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यास द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६ विशेष पुरस्कार जाहीर झाला असून कारखान्याने गेल्या तीन वर्षात १०० टक्के उसाची तोड केवळ हार्वेस्टरद्वारे होत आहे. कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्याकडे याचे श्रेय जाते. देशभरात केवळ मांजरा साखर कारखाना 100% हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणारा पहिला कारखाना ठरलेला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने राज्यभरातून मांजरा साखर कारखान्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया यांच्या वतीने 71 व्या वार्षिक परिषद व साखर एक्सपो 2026 इंडिया या कार्यक्रमांमध्ये आठ ऑगस्ट 2026 रोजी हॉटेल जे डब्ल्यू मेरीयट पुणे येथे मान्यवराच्या हस्ते या पुरस्काराचे शानदार सोहळ्यात वितरण करण्यात येणार आहे. दिलीपराव देशमुख जिल्हा बँकेच्या मदतीने ऊस तोडणीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व होतकरू तरुणांना ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर देण्यात आले. त्यात तोडणी यशस्वी झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोड लवकर होऊ लागली. त्यानंतर जिल्हा बँकेकडून बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांना हार्वेस्टर कर्ज योजना सुरू केली. त्यात ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतः बँकेकडून कर्ज काढून हार्वेस्टर खरेदी केले. मांजरा साखर कारखान्याचे स्वतःचे २५ व कारखान्याने हमीवर दिलेले 55 असे एकूण 80 हार्वेस्टर आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here