लातूर : जागृती शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीजकडून ऊस पुरवठादारांच्या खात्यात १४ कोटी जमा

लातूर : राज्यातील खाजगी साखर उद्योगात एफआरपीपेक्षा अधिक भाव देणाऱ्या देवणी तालुक्यातील तळेगाव भो. येथील जागृती शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीजने यंदाच्या गळीत हंगामातील २१ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ४७ हजार ९७३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या ऊस पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसाचा पहिला हप्ता ३ हजार रुपयांप्रमाणे १४ कोटी ३९ लाख २० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. दीपावली सणापूर्वी जागृती शुगरकडून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे.

चालू हंगामात २ नोव्हेंबर अखेर चालू गाळप शुगर एकूण गाळप केले आहे. कारखान्याचे जागृती कारखान्याने ५७,४९० मे. टन ऊसाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी पहिला हप्ता ३ हजार रुपये व १० दिवसांत बिल देण्याची घोषणा केली होती. तो शब्द पाळला असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीपूर्वी अगदी १० दिवसांत गाळप झालेल्या ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा करण्यात आली आहे. ज्या ऊस पुरवठा शेतकऱ्यांनी २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत कारखान्यास ऊस पुरवठा केला, त्या ऊस पुरवठा शेतकऱ्यांची बिलाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बिलाची रक्कम उचलून घ्यावी, असे आवाहन जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, सख्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here