सांगली : ‘एकरी १५० टन ऊस उत्पादन’ विषयावरील विशेष कार्यशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे शेतकरी सन्मान सोहळा आणि ‘एकरी १५० टन ऊस उत्पादन’ यावरील कार्यशाळा झाली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने ऊस उत्पादन एकरी १०० टनांपुढे नेण्याचे ध्येय ठेवावे. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब केल्यास ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

वाळवा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अथक परिश्रम आणि नावीन्यपूर्ण प्रयोगांच्या बळावर शेतीत उल्लेखनीय यश मिळविले आहे याचा उल्लेख आमदार पाटील यांनी केला. यावेळी आयोजित केलेल्या ‘एकरी १५० टन ऊस उत्पादन’ कार्यशाळेत कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश मिरजकर आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवशे यांनी शास्त्रीय ऊस लागवड, आधुनिक सिंचन तंत्र, संतुलित खत व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषद सभापती सावित्री रवि पाटील, पंचायत समिती सभापती उदयसिंह पाटील, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here