कोल्हापूर : ऊस रोपवाटिका होताहेत हायटेक, टिश्यू कल्चर ब्रिडर सीड्सपासून रोपनिर्मिती सुरू

कोल्हापूर : शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांतील अनेक तरुणांनी ऊस रोपवाटिका हा स्वतंत्र उद्योग म्हणून स्वीकारला आहे. नियंत्रित वातावरण, शेडनेट, कोकोपीट ट्रे, ठिबक सिंचन, सेंद्रिय पोषण व्यवस्थापन आणि नियमित तांत्रिक देखरेखीमुळे आता या रोपवाटिका आधुनिक कृषी उद्योगाचे स्वरूप धारण करीत आहेत. या रोपवाटिका आता हायटेक होत आहेत. इतरत्र सध्या ऊस बेण्यांवर आधारित रोपे तयार करण्यावर भर आहे. मात्र, यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टिश्यू कल्चर ब्रिडर सीड्सपासून ऊस रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या रोपांची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.

टिश्यू कल्चर ऊस रोपांचे विविध फायदे आहेत. प्रयोगशाळेत तयार झाल्यामुळे रोपे रोगमुक्त, शुद्ध असते. त्याची एकसमान वाढ होत असल्याने दर्जेदार पीक मिळण्यास मदत होते. त्यातून ऊस उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ मिळते. अधिक उगवण क्षमता, फुटवा जास्त, कीड, रोगांचा प्रादूर्भाव तुलनेने कमी हे याचे फायदे आहेत. याशिवाय, साखरेचा उतारा सुधारण्यास मदत होत. कमी उत्पादन खर्च, उत्पन्नात वाढ यामुळे टिश्यू कल्चर ऊस रोपांकडे लोक वळत आहेत. ही ऊस शेतीतील गुणवत्तेच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

रोपवाटिका चालकांनी एक पाऊल पुढे टाकत प्रयोगशाळेत विकसित केलेल्या टिश्यू कल्चर ब्रिडर सीड्सपासून मातृ रोपे तयार करून त्यापासून रोपनिर्मिती केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक शुद्ध, निरोगी आणि एकसारख्या गुणवत्तेची रोपे उपलब्ध होऊ लागली आहेत. याबाबत कृषिभूषण फाऊंडेशन ऊस रोपवाटिकेचे एल. डी. कुंभार म्हणाले की, शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे उपलब्ध होत असून, ऊस शेती अधिक उत्पादनक्षम बनत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here