सोलापूर : गोकुळ शुगर्सकडील तीन हंगामातील थकीत ऊस बिलप्रश्नी मोर्चा काढण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

सोलापूर : गोकुळ सहकारी साखर कारखान्याकडील तीन गळीत हंगामातील थकीत ऊस बिलप्रश्नी मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. गोकुळ सहकारी साखर कारखान्याने सुमारे ७० गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तीन वर्षांपासूनची ऊस बिले अद्याप अदा केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून, त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. ऊस बिले तातडीने द्यावीत या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघटना, गोकुळ थकीत ऊस बिल संघर्ष समिती आणि अक्कलकोट शेतकरी बांधव यांच्या वतीने १० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी दुपारी १२ वाजता सोलापूरातील चार हुतात्मा चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

संघटनांनी दिलेल्या निवेदनानुसार, साखर कारखान्याकडील सन २०२३, २०२४ आणि २०२४-२५ या तीन गळीत हंगामांतील थकीत ऊस बिले थकीत आहेत. सन २०२४-२५ गळीत हंगामातील सुमारे ५० कोटी रुपये ऊस बिलाची रक्कम अदा करण्यात आली असली, तरी मागील तीन हंगामांतील संपूर्ण थकीत रक्कम अद्यापही बाकी आहे. ऊसदर नियंत्रण आदेशानुसार ऊस खरेदीनंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, कारखान्याकडून या नियमाची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here