जालना : समर्थ शुगरच्या युनिट २च्यावतीने एआय तंत्रज्ञानासह ऊस शेतीवर परिसंवाद

जालना : समर्थ युनिट क्रमांक २ (सागर) कारखान्याच्यावतीने शिंदेवडगाव येथे ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढ आणि सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून ऊस उत्पादन वाढविण्याचे आवाहन मार्गदर्शकांनी केले. या कार्यक्रमात प्रारंभी सरपंच वसंत भुतेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

परिसंवादात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. याचबरोबर उत्पादनवाढीसाठी रानबदल, पिक बदल आणि ऊस वाण बदलण्याची गरज यावर चर्चा करण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून शेणखताचा अधिक वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असेही यावेळी सांगण्यात आले. ऊस गाळपासाठी इतर कारखान्यांकडे ऊस न पाठविण्याचे महत्त्व काय आहे, याविषयी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कारखान्याच्यावतीने हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीस सहकार्य करण्याचे आश्वासनही देण्यात आले. कार्यक्रमास कारखान्याचे माजी संचालक श्रीधर भुतेकर, कार्यकारी संचालक समुद्रे, शेतकी अधिकारी काळे, अॅग्री ओव्हरसीयर सय्यद यांसह कारखान्याचे कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here