बीड : बालहक्क आयोगाची बीड जिल्ह्यात धडक, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा घेतला आढावा

बीड : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या संपूर्ण पथकाने बुधवारी बीड जिल्ह्यात धडक दिली. या भेटीत जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बाल हक्क संरक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. सुनावणीत एकूण १८ प्रकरणांपैकी १० प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली व उर्वरित प्रकरणांबाबत आवश्यक निर्देश दिले. यावेळी प्रलंबित प्रश्नांवर जलद गतीने न्याय देत आयोगाने संवेदनशीलता दाखवली. आयोगाचे अध्यक्ष अॅड. संजय पुराणिक व सर्व सदस्यांनी एचआयव्ही बाधीत बालकांच्या विशेष बालगृहाला भेट देऊन मुलांसाठीच्या सुविधांची आत्मीयतेने पाहणी केली.

अॅड. पुराणिक यांनी प्रशासनातील सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज याप्रसंगी व्यक्त केली. राज्यातील बाल स्नेही पंचायत अभियानासाठी निवडलेल्या १०० गावांमध्ये बीड जिल्ह्यातील तीन गावांनी बाजी मारली आहे. यामध्ये केज तालुक्यातील पिंपळगाव, बीड तालुक्यातील बोरफडी आणि धारूर तालुक्यातील हिंगणी या गावांची विशेष निवड झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. आयोगाच्या सचिव वंदना जैन, सदस्य गीतांजली बुटी, शुभांगी तांबट, संजय लहाके पाटील, अतुल देसाई, प्रवीण भुजाडे, मिलन जंगम, कनिष्ठ काळजी वाहक अजय लोंढे, परिविक्षा अधिकारी उज्वला होवाळ, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शेख फारुख व इतर अधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here