तमिळनाडू : उसाला ७०९ रुपये अनुदानाची मुख्यमंत्री विजय यांची घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार प्रति टन ४००० रुपये दर

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी राज्यातील भात आणि ऊस या दोन पिकांसाठी अनुदानाची घोषणा केली आहे. यानुसार राज्य सरकार उसासाठी ७०९ रुपये प्रतिटन अनुदान देणार आहेत. त्यामुळे गेल्या गाळप हंगामातील उसासाठी शेतकऱ्यांना एकूण ४,००० रुपये दर मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी भातासाठीही २८९ रुपये अनुदान जाहीर केले आहे. तमिळनाडूत १ सप्टेंबरपासून भात खरेदीचा हंगाम सुरू होणार आहे. उत्तम प्रतिच्या भातासाठी २८९ रुपये आणि सामान्य प्रतीच्या भातासाठी १५६ रुपये अनुदान राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे उत्तम प्रतीच्या भातासाठी एकूण खरेदी किंमत २,७५० रुपये प्रति क्विंटल असणार आहे, तर तर सामान्य प्रतीच्या भाताची खरेदी किंमत २,६०० रुपये प्रति क्विंटल असेल.

मुख्यमंत्री विजय यांनी सांगितले की, ऊस उत्पादकांसाठी हंगाम २०२५-२६ साठी हे अनुदान मिळणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत उसाच्या अनुदानात ३६० रुपये वाढ करून ७०९ रुपये करण्यात आले आहे. केंद्र सरकारची ९.५ टक्के उताऱ्यासाठी एफआरपी ३२९० रुपये होती. यावर शेतकऱ्यांना ७०९ रुपये अनुदान मिळाणार आहे. त्यामुळे उस उत्पादकांना एकूण ४ हजार रुपये मिळणार आहेत. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या हमीभावावर राज्य सरकारकडून प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल. तमिळनाडू सरकार भात आणि उसासाठी अनुदान देत असते. त्यात भरीव वाढ करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सरकारच्या अनुदानामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रति टन ४,००० रुपये दर मिळणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here