छत्रपती संभाजीनगर : गंगापूर कारखान्याच्या संचालक मंडळावरील कारवाईस १५ दिवसांचे मिळणार संरक्षण

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच कारखान्याचे नवीन खाते उघडून इतर सभासदांसाठी अनावश्यक खर्च केल्याच्या तक्रारीची दखल घेत साखर सहसंचालकांनी कारखान्याच्या संचालक मंडळाला नोटीस बजावली आहे. संचालक मंडळाविरोधात बजावलेल्या नोटिशीसंदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्या. एन. बी. सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. संचालक मंडळाविरोधात प्रतिकूल आदेश झाल्यास त्याची १५ दिवस अंमलबजावणी करू नये, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या प्रकरणी कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील-डोणगावकर यांनी याचिका दाखल केली आहे.

संचालक दिलीप पाटील-बनकर यांनी ८ एप्रिल २०२५ रोजी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यामध्ये कारखाना चेअरमननी ३ जानेवारी २०२५ रोजी कारखान्याचे नवीन खाते उघडले. इतर सभासदांसाठी अनावश्यक खर्च केला. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांच्या संचालक मंडळाने पदभार स्वीकारला. आधीच हा अनावश्यक खर्च केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला. यानंतर साखर आयुक्तांनी २६ मे २०२५ रोजी साखर सहसंचालकांना यासंदर्भात पत्र दिले. साखर संचालकांनी संचालक मंडळ निष्प्रभावी करून प्रशासक नियुक्ती का करू नये, अशी नोटीस बजावली. दरम्यान, खंडपीठाने संचालक मंडळाच्या विरोधात प्रतिकूल आदेश झाल्यास त्याची १५ दिवस अंमलबजावणी करू नये, असे निर्देश दिले. या प्रकरणात १८ ऑगस्ट रोजी साखर संचालकांसमोर सुनावणी होणार आहे. संचालक मंडळावर कारवाई झाल्यास अपील करण्यास मुदत देण्यासाठी आदेशाच्या अंमलबजावणीपासून संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here