पुणे : अपघातग्रस्त कुटुंबीयांना सोमेश्वर कारखान्याचा आधार; अपघात विम्यातून प्रत्येकी ४ लाखांची मदत

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामात अपघाती निधन झालेल्या ४ सभासदांच्या कुटुंबीयांना विमा योजनेतून प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते सुपूर्द केले. माळवाडी-लाटे येथील दिवंगत आप्पा कृष्णा शिंदे, शिरष्णे येथील दिवंगत दत्तात्रय नाथ्याबा यादव, पानसरेवाडी-सुपा येथील दिवंगत झुंबर निवृत्ती पानसरे आणि जेऊर येथील दिवंगत प्रकाश दत्तात्रय तांबे या सभासदांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष किसन तांबे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, अधिकारी कालीदास निकम, सचिव भारत खोमणे, प्राचार्य पी. बी. जगताप तसेच सुरेश सूर्यवंशी उपस्थित होते.

सभासदाच्या कुटुंबावर अचानक आलेल्या संकटाच्या काळात विम्याच्या माध्यमातून भरीव आर्थिक मदत उपलब्ध करून देत कारखान्याने सभासदांच्या कुटुंबीयांप्रति असलेली सामाजिक बांधिलकी जपली आहे. सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारा करण शरद भगत (रा. मुर्ती) याचा सोमेश्वर येथे अपघात झाला होता. उपचारादरम्यान दि. १६ जुलै रोजी त्याचे निधन झाले. याप्रसंगी सोमेश्वर विद्यालय व करंजे भागशाळेतील शिक्षक, प्राचार्य आणि विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी व माणुसकी जपत एक हात मदतीचा’ या भावनेतून ५५ हजार रुपयांची मदत जमा केली. ही मदत सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, लालासाहेब नलवडे, प्राचार्य व शिक्षकांच्या उपस्थितीत करणच्या भावाकडे सुपूर्द करण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here