कोल्हापूर : पूरबाधित क्षेत्रासाठी उसाचे नवे वाण विकसित करण्याचे कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे आवाहन

कोल्हापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य डॉ. शशिकांत तरंगे यांनी बुधवारी मार्केट यार्ड परिसरातील प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्रास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातील पथदर्शक गुऱ्हाळघर तसेच यांत्रिकीकृत गुऱ्हाळघराला भेट देऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतली. यावेळी उपस्थित संशोधक, शास्रज्ञांना त्यांनी पूरबाधित क्षेत्रातील ऊस उत्पादकांच्या अडचणी लक्षात घेऊन अशा भागासाठी उपयुक्त ठरणारे उसाचे नवीन वाण विकसित करण्यावर संशोधन केंद्राने भर द्यावा, असे आवाहन केले.

यावेळी कृषिविद्यावेत्ता डॉ. विद्यासागर गेडाम यांनी केंद्रात सुरू असलेल्या ऊस संशोधनाची तसेच ऊस बेणे मळ्याची माहिती दिली. वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. दीपक सावळे यांनी गुळाच्या विविध मूल्यवर्धित पदार्थांची माहिती दिली. डॉ. तरंगे यांनी गूळ निर्मितीतील आधुनिक पद्धती, यांत्रिकीकरण आणि मूल्यवर्धित उत्पादनांचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी संशोधन कार्यासाठी आवश्यक त्या बाबींमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कनिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. गोविंद येनगे यांनी पथदर्शक व यांत्रिकीकृत गुऱ्हाळघरातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड, महेंद्र वळसे, अतुल पांडव, कृष्णात गुरव, सारिका पाटील, सुनीता खोत, आशिष जाधव उपस्थित होते. कृषी सहायक माहेश्वरी पांडव यांनी सूत्रसंचालन केले. ऊस पैदासकार डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here