योग्य पीक आणि खतांच्या व्यवस्थापनातून उसाचे उच्चांकी उत्पादन शक्य : कृषिभूषण अशोक खोत

सांगली : योग्य पीक आणि खतांच्या व्यवस्थापनातून उसाचे उच्चांकी उत्पादन शक्य असल्याचे प्रतिपादन कृषिभूषण अशोक खोत यांनी केले. कोरेगाव (ता. वाळवा) येथे आयोजित ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात खोत बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बी. के. पाटील प्रमुख उपस्थित होते. शासनाचा कृषी विभाग आणि ग्रामपंचायतीच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘एकरी १५० टन ऊस लागवड तंत्रज्ञान’ या विषयावर अशोक खोत यांनी मार्गदर्शन केले.

तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण, माजी सरपंच संपतराव पाटील, प्रगतशील शेतकरी मोहन मगदूम, अजित पाटील, अरुण पाटील, प्रशांत पाटील, सागर गावडे, सागर पाटील, पोलिसपाटील सर्जेराव गावडे, कृषिमित्र संदीप पाटील, उपकृषी अधिकारी मकरंद कारंजकर, सहायक कृषी अधिकारी अमोल पवार, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक नागेश जमदाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

अशोक खोत म्हणाले, शेतकऱ्यांनी आता अधिकाधिक उसाचे उत्पादन घेण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. सातत्याने एक आणि एकच उसाचे पीक घेत राहिल्याने शेतजमिनीची उत्पादकता कमी होऊ लागली आहे. अशा काळात उसाचे चांगले उत्पादन घेणे कसोटीचे ठरत आहे. आज ऊसशेती महाग होत असल्याची चर्चा होत आहे. मात्र चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पिकाचे अधिक काटेकोर खत, पाणी याचे नियोजन करण्याची गरज आहे. मेळाव्यास शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप पाटील यांनी आभार मानले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here