छत्रपती संभाजीनगर : चौढाळा येथील रेणुकादेवी – शरद सहकारी साखर कारखान्याचे २०२६-२७ गळीत हंगामाचा रोलर पूजन समारंभ शनिवारी (दि. १५) कारखान्याचे चेअरमन, आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पात्र ठरलेल्या रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ च्या गळती हंगामाचे रोलर पूजन चेअरमन आ. विलासबापू भुमरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी आ. विलास भुमरे यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस सभासदांसाठी कारखान्याच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांनी कारखाना आपला समजून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कारखान्यात प्रतिदिन २२०० मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात येत असून. ऊस उत्पादकाचा संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत कारखाना सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे, व्हा. चेअरमन नंदू पठाडे, रेणुकादेवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर, रोहिदास रेवडकर, कार्यकारी संचालक नामदेव बावडकर, जनरल मॅनेजर चंद्रकांत पाटील, सचिन अजबे, अनिल पांढरे, अण्णासाहेब ढवळे, रमेश झिरपे, राजेंद्र चौधरी, श्रीमंत टेकाळे, हर्षद दुबाले संचालक चंद्रकांत गावंदे, लक्ष्मण डांगे, विष्णू नवथर, नितीन तांबे, ब्रह्मदेव नरके, भीमराव वाकडे, अक्षय डुकरे, दिलीप बोडखे, अफसर शेख, सुभाष गोजरे अमोल थोरे, भरत तवार, कल्याण धायकर, भगीरथीबाई गाभूड, पुष्पाबाई लांडगे, द्वारकाबाई काकडे, ज्ञानदेव बढे यांच्यासह ऊसउत्पादक शेतकरी कामगार उपस्थित होते.


















