बीड : एआय तंत्रज्ञानातून ऊस उत्पादनात वाढ शक्य, थेट शिवारात शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन

बीड : पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने यापुढे एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस लागवड केल्यास शेतकऱ्यांना कमी खर्चात विक्रमी उत्पादन घेता येऊ शकते, असे मत लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी रवी देशमुख यांनी व्यक्त केले.परळी तालुक्यातील बोरखेड-कासारवाडी शिवारात व्हीएसआय, केव्हीके बारामती आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, या उद्देशाने तंत्रज्ञान साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानावर आधारित ऊस पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ऊसपुरवठा अधिकारी भागवत वगरे, दिगंबर सोळंके, अमरनाथ स्वामी, विश्वजित देशमुख, संचालक प्रभाकर पौळ, राजाभाऊ निर्मळ, अनिल कोकाटे, बालासाहेब गव्हाणे, के. डी. कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.कारखान्याच्या माध्यमातून विभागातील अविनाश जाधव, अशोक जाधव यांच्यासह १३ शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस लागवड केली. या तंत्रज्ञानाद्वारे अचूक वाणाची निवड, पाण्याची बचत, ठिबक सिंचन, ड्रोन फवारणी, हवामानातील बदल, खताची कमतरता किंवा अधिकता तसेच पिकाला आवश्यक तेवढे पाणी याबाबतची माहिती अॅपद्वारे शेतकऱ्यांना मिळते.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, एआय तंत्रज्ञानाच्या साह्याने फेब्रुवारीमध्ये लागवड केलेल्या ८६०३२ वाणाच्या उसाला सात महिन्यांत १५ ते १६ कांड्या आल्या आहेत. एका उसाला १२ ते १४ फुटवे असून एका उसाचे वजन अडीच ते तीन किलोपर्यंत होऊ शकते. त्यामुळे एकरी ७० ते ८० टनांच्या जवळपास उत्पादन मिळण्याचा विश्वास शेतकरी अविनाश जाधव आणि रावसाहेब जाधव यांनी व्यक्त केला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here