वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आंबोलीतील ऊस प्रजनन केंद्रास ब्राझीलच्या शास्त्रज्ञांची भेट

पुणे : ब्राझीलच्या प्रख्यात ‘सीटीसी’ या ऊस तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक व्यवहार व्यवस्थापक व शास्त्रज्ञ डॉ. मायकल बटरफिल्ड यांनी ‘व्हीएसआय’च्या आंबोली ऊस प्रजनन केंद्रास नुकतीच भेट दिली. यावेळी वसंतदादा शुगर इस्टिट्यूटचे (व्हीएसआय) विश्वस्त माजी अर्थमंत्री जयंत पाटील, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडूपाटील तसेच शास्त्रज्ञ उपस्थित होते. साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऊस प्रजननाचा मुद्दा मोलाचा ठरतो. हवामान बदलामुळे ऊस प्रजनन शास्त्राचे महत्त्व आणखी वाढले आहे. हवामान बदलामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लवकर पक्व होणारे अधिक साखर उतारा देणारे ऊस वाण द्यावे लागेल, असे मत व्हीएसआयचे विश्वस्त व माजी अर्थमंत्री पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी व्हीएसआयच्या रेणवीय जीवशास्त्र आणि अनुवंश अभियांत्रिकी विभागाचे डॉ. अशोक जगताप यांनी प्रगत ऊस प्रजनन पद्धती तसेच हवामान बदलाचा सामना करू शकणाऱ्या नव्या वाणांच्या विकासावर माहिती दिली. आंबोली केंद्राचे प्रमुख व मुख्य शास्त्रज्ञ डॉ. कपिल सुशील यांनी ऊस जर्मप्लाझम (अनुवांशिक द्रव्य), क्रॉसिंग प्रोग्राम (संकर पद्धती) तसेच व्यापारी तत्त्वावरील ऊस वाण संशोधनावर माहिती दिली. व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी सांगितले की, व्हीएसआय तसेच आंबोली ऊस प्रजनन केंद्रात हवामान बदलाचे अडथळे विचारात घेत संशोधन सुरू आहे. त्यातून अधिक उत्पादनाच्या वाण विकासाला दिशा मिळेल. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशीदेखील चर्चा केली जात आहे. यातून राज्याच्या भविष्यकालीन शाश्वत ऊस शेतीला दिशा मिळेल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here