सोलापूर : सहकारमहर्षी साखर कारखान्याच्या वतीने एकरी १०० मे. टन ऊस उत्पादनाच्या उद्देशाने डॉ. संजीव माने यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. माने यांनी जमिनीची सुपीकता, लागवड पद्धत, पाणी व्यवस्थापन, रासायनिक अन् सेंद्रिय खतांच्या मात्रा तसेच पीक संरक्षण याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
एकरी १०० मे. टन ऊस उत्पादनासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माने यांनी केले. शेतकऱ्यांनी नियोजन केल्यास एवढे उत्पादन घेणे सहजशक्य असल्याचे ते म्हणाले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालक सुहास यादव, अधिकारी, कर्मचारी अन् सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















