सोलापूर : जयहिंद शुगरची गाळप हंगामासाठी जय्यत तयारी; मिल रोलर पूजन, तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ

सोलापूर : आगामी २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जयहिंद शुगर प्रा. लि., आचेगावची जय्यत तयारी झाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बब्रुवान माने-देशमुख यांनी सांगितले. मिल रोलर पूजन, तोडणी वाहतूक करारांचा शुभारंभ करण्यात आला.शेतकरी, तोडणी-वाहतूक व हार्वेस्टिंग मशीन ठेकेदारांनी कोणताही संभ्रम न बाळगता जयहिंद शुगरशी जोडावे, असे आवाहन माने देशमुख यांनी केले. दुष्काळी परिस्थितीतही कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी व ठेकेदारांची देयके वेळेत अदा करून विश्वास कायम ठेवला असून, यंदाच्या हंगामाचेही नियोजन भक्कम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमास व्हाईस चेअरमन विक्रमसिंह पाटील, मार्गदर्शक विजय वाकचौरे, जनरल मॅनेजर कुबेरदास कलुब्रम्हे, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर अमोल जगताप, केन मॅनेजर चंद्रशेखर जेऊरे, मुख्य शेती अधिकारी राहुल घोगरे, चीफ केमिस्ट अमोल पाटील, डिस्टिलरी मॅनेजर शरद जगताप, इलेक्ट्रिकल मॅनेजर किरण तोरगळकर, को-जन मॅनेजर के. लक्ष्मण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

हंगामाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले. तसेच शेती विभागामार्फत तोडणी-वाहतूक करार पूजन व करारांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी ठेकेदारांनी मोठ्या संख्येने कारखान्याशी करार करण्याचे आवाहन करण्यात आले. कारखाना परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here