कोल्हापूर : दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशनतर्फे कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वोत्कृष्ट पुरस्कार

कोल्हापूर: गोवा येथे दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेच्या झालेल्या ८४ व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखर उत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यास वतीने सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासो चौगुले, संचालक सूरज बेडगे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी व कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कारखान्याच्या उल्लेखनीय कार्यक्षमतेबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कारखान्याचे संस्थापक, अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी आवाडे जवाहर कारखान्यास मिळालेला हा पुरस्कार देशातील साखर उद्योगाच्या तांत्रिक प्रगतीस आणि कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. पुरस्काराबद्दल कारखान्यास ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी, संचालक, ऊस तोडणी मजूर-वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे राहुल आवाडे यांनी नमूद केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here