साखर दर वाढले, ऊस उत्पादकांना प्रतिटन ५२५ रुपये दुसरा हप्ता द्या; ‘जय शिवराय’सह विविध शेतकरी संघटनांची मागणी

कोल्हापूर: साखरेच्या वाढलेल्या दरातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा. २०२५-२६ मधील गळीत हंगामातील प्रतिटन उसाला ५२५ रुपये प्रतिटन दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कारखान्यांनी याचा विचार केला नाही, तर १५ सप्टेंबर २०२६ नंतर आंदोलनाचा इशारा दिला.

निवेदनात म्हटले आहे कि, मागील हंगामात साखरेची सरासरी ४० रुपये किलो दराने विक्री झाली होती. सध्या साखर कारखान्यांकडे सुमारे २० टक्के साखर शिल्लक असून, साखरेच्या दरात सरासरी १५ रुपये किलोपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे कारखान्यांना शिल्लक साखरेच्या विक्रीतून मोठे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. पाच लाख टन ऊस गाळप करणाऱ्या कारखान्याने १२.५० टक्के रिकव्हरीनुसार सुमारे ६२ हजार ५०० टन साखरेचे उत्पादन केले, असे गृहीत धरले आहे. त्यातील २० टक्के साखर शिल्लक असल्यास वाढलेल्या दरामुळे सुमारे १८ कोटी ७५ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. या वाढीव उत्पन्नाच्या आधारे प्रतिटन ३७५ रुपये दुसरा हप्ता देणे शक्य आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

मागील हंगामातील पहिल्या हप्त्यातील सुमारे १५० रुपये प्रतिटन रक्कम काही कारखान्यांकडून देणे बाकी आहे. त्यामुळे वाढीव नफा ३७५ रुपये आणि थकीत १५० रुपये, असे मिळून किमान ५२५ रुपये प्रतिटन दुसरा हप्ता देण्याचे आदेश काढावेत. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, सावकार मादनाईक, वैभव कांबळे, रुपेश पाटील, जनार्दन पाटील, भगवान काटे, ज्ञानदेव पाटील, माणिक पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here