सातारा : साखरेच्या दरवाढीचा फायदा कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची मागणी

सातारा : गेल्या काही महिन्यांपासून सहकारी व खासगी साखर कारखाने वाढलेल्या बाजारभावाप्रमाणे साखर विकत आहेत. ही सर्व साखर गेल्या हंगामातील असून त्याचा उत्पादनाचा खर्च कमी आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना या साखर विक्रीवर अधिक फायदा मिळणार आहे. या फायद्यातील काही भाग ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे, असे मत शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले. साखर ७० रुपये किलो केल्याबरोबर महागाईबद्दल अनेकांना कंठ फुटू लागला आहे. पण शेतकऱ्याचा उत्पादन खर्च गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला त्याबद्दल कोणी बोलत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

याबाबत थोरात यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून साखरेचे घाऊक व किरकोळ दर सतत वाढत आहेत. दीड वर्षात साखरेचे दर ४५ रुपयांच्या पुढे राहून आज ७० रुपयांवर गेले. ऊसापासून इथेनॉल, स्पिरिट देशी-विदेशी दारू, वीज असे अनेक उपपदार्थ तयार होतात. त्याचेही दर वाढत चालले आहेत. अशा परिस्थितीत उसाचे दर का थांबलेले आहेत याचे उत्तर साखर कारखानदारांसह राज्य व केंद्र सरकारने देणे गरजेचे आहे. सध्या साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील किती टन साखर सरकारी गोदामात शिल्लक आहे? गेल्या वर्षभरात दर महिन्याला साखर काय दराने व किती विकली याची माहिती शेतकरी व सभासदांना द्यावी. मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांनी यात लक्ष घालावे व वाढीव साखरेच दराचा फायदा शेतकऱ्यांना करून द्यावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

2 COMMENTS

  1. केंद्रीय सहकारिता मंत्रालय यांच्या कडे अद्ययावत माहिती असते व त्यांनीच साखर धोरण राबविले पाहिजे .. आणि दरवाढ ही परिस्थितीनुसारच राहिल याकडे लक्ष द्यावे… शेवटी सर्वच उत्पादने ही मानविय सेवेत असतात.
    यासाठी एक नजर स्थिर विश्वासाने चौफेर ठेवून ,भेसळ थांबवून रासायनिक खते मिळावीत तसेच ऊस पिकास जे श्रम मेहनत लागते याचा वर्तमान डोळस ठेवूनच श्रमाला प्रतिष्ठा ही भ्रष्टाचार सोडून मिळावी…
    आणि म्हणूनच साखर आयात निर्यात धोरण रहावे.
    याकरितां दरवाढीचे संकेत मिळतील ..हे पहावे.

  2. केंद्रीय सहकारिता मंत्रालय यांच्या कडे अद्ययावत माहिती असते व त्यांनीच साखर धोरण राबविले पाहिजे .. आणि दरवाढ ही परिस्थितीनुसारच राहिल याकडे लक्ष द्यावे… शेवटी सर्वच उत्पादने ही मानविय सेवेत असतात.
    यासाठी एक नजर स्थिर विश्वासाने चौफेर ठेवून ,भेसळ थांबवून रासायनिक खते मिळावीत तसेच ऊस पिकास जे श्रम मेहनत लागते याचा वर्तमान डोळस ठेवूनच श्रमाला प्रतिष्ठा ही भ्रष्टाचार सोडून मिळावी…
    आणि म्हणूनच साखर आयात निर्यात धोरण रहावे.
    याकरितां दरवाढीचे संकेत मिळतील ..हे पहावे.
    याबाबत असे भाष्य कुणी केल्याचे ऐकिवात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here