सोलापूर : गोकुळ शुगर्सच्या थकीत ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा; सुमारे २ कोटी ५० लाख रुपये थकीत

सोलापूर : गेल्या तीन वर्षांपासून ऊस बिलाची थकीत रक्कम न मिळाल्याने धोत्री येथील गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. चालू हंगामातील सुमारे ५० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत, मात्र मागील तीन वर्षांपासून थकीत असलेली सुमारे २ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी संघटना गोकुळ शुगर ऊस बिल संघर्ष समिती, धाराशिव, सोलापूर व लातूर शेतकरी बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनम गेट येथे आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापूरच्या प्रांताधिकारी कार्यालयावर ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकरी संघटनेने निवेदनातून दिला आहे.

गोकुळ शुगर शेतकरी संघर्ष समितीने सोमवारी पूनम गेटसमोर थकीत ऊस बिलाच्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी संघटनेचे समन्वयक अॅड. अमोल पाटील, अरविंद घोडके आदी उपस्थित होते. यापूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी प्रांताधिकारी, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार यांच्या मध्यस्थीने १८ दिवसांचे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ५० कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली. मात्र, मागील तीन वर्षांपासून थकीत असलेले ऊस बिल न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी कायम आहे. कारखान्याने सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या गळीत हंगामातील सुमारे ७० गावांतील ऊस उत्पादकांचे ऊस बिल पूर्णपणे अदा केलेले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सिद्धेश्वर मंदिरापासून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू होईल असा इशारा संघटनेने दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here