पुणे : आगामी गळीत हंगामात भीमा-पाटस कारखाना कोण चालवणार ? सभासदांत उत्सुकता

पुणे : यंदाच्या गळीत हंगामात दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना कोण चालवणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. काही महिन्यांपूर्वी भीमा-पाटस कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी राज्य बँकेचा निराणी ग्रुपसोबत करार झाल्याची माहिती सभासदांना होती. मात्र, गळीत हंगामाच्या तोंडावर हा कारखाना अन्य एका मोठ्या साखर कारखाना समूहाच्या ताब्यात गेल्याची चर्चा सोशल मीडियावरून पसरू लागली आहेत. गेल्या चार हंगामापासून ‘भीमा पाटस’कडून ऊसाला मिळणारा एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर आणि वजनातील पारदर्शकता यामुळे सभासदांमध्ये ‘भीमा पाटस’बद्दल आस्था आहे. त्यामुळे व्यवस्थापनाची अनिश्चितता शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे.

‘भीमा पाटस’च्या व्यवस्थापनाकडून या विषयावर स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून कारखान्याचा ताबा नेमका कोणाकडे आहे आणि कोणाकडे जाईल, यावरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखाना भाडेतत्त्वावर निराणी ग्रुप चालवणार की अन्य कोणाकडे कारभार सोपवण्यात आला आहे, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यातील एका प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारखाना निराणी ग्रुपकडेच असून तेच कारखाना चालवणार असल्याचे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here