चेन्नई : दक्षिण भारतीय ऊस व साखर तंत्रज्ञ संघटनेतर्फे गौरी शुगरला तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार

अहिल्यानगर : गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, प्रभावी कारखाना व्यवस्थापन आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरी शुगर अॅण्ड डिस्टिलरीज, बाजोळगा (युनिट १३) यांना दक्षिण भारतीय ऊस व साखर तंत्रज्ञ संघटनेतर्फे तांत्रिक कार्यक्षमतेतील उत्कृष्ट कारखाना कामगिरीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील दक्षिण भारतीय ऊस व साखर तंत्रज्ञ संघटनेच्या ५५व्या वार्षिक अधिवेशनात हा पुरस्कार देण्यात आला.

ओंकार शुगरचे संचालक ओमराजे बाबूराव बोत्रे-पाटील यांनी समूहातर्फे पुरस्कार स्वीकारला. यावेळी युनिट १३चे अधिकारी उपस्थित होते. चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर, उत्पादन प्रक्रियेतील कार्यक्षमता, तांत्रिक व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केली. हा पुरस्कार अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची पावती असल्याची भावना व्यवस्थापनाने व्यक्त केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here