धाराशिव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याच्या वार्षिक सभेत संस्थापक, अध्यक्ष गोरे यांचा सन्मान

धाराशिव : केशेगाव (ता. धाराशिव) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक बैठक अरविंदनगर येथे नुकतीच पार पडली. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांचा ‘द शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया’ या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने नुकतेच या वर्षीचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल आंबेडकर परिवाराच्यावतीने हरिदास कळसुले व आगतराव लोमटे यांच्या हस्ते गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सातही सर्कलनिहाय अहवाल वर्षात सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.

कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे म्हणाले की, यंदा पावसाने दडी मारली आहे. कठीण परिस्थितीत पाणी बचत करून ऊस पिकवणे गरजेचे आहे. यासाठी कारखान्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, पहिल्या टप्प्यात २५० शेतकऱ्यांना सहभागी करून कमी पाण्यात व कमी खर्चात ऊस कसा जगवायचा, याचे मार्गदर्शन केले जात आहे. यावेळी कार्यकारी संचालक एस.पी. डाके यांनी बैठकीसमोर मांडण्यात आलेल्या सर्व विषयांचे व ठरावांचे वाचन केले. त्याला उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली. कारखान्याचे उपाध्यक्ष विलास भुसारे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here