कर्नाटक : ऊस पिकातील खोड किडा व्यवस्थापनाबाबत बेळगाव शुगर, निजलिंगप्पा इन्स्टिट्यूटतर्फे मार्गदर्शन

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक व शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब करून उसाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन प्रगतिशील शेतकरी व डीसीसी बँकेचे माजी सदस्य राजेंद्र अंकलगी यांनी केले. बेळगाव शुगर प्रायव्हेट लिमिटेड (हुदली) आणि एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट (बेळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा झाली. यावेळी एकात्मिक ऊस उत्पादन तसेच ऊस पिकावरील ‘ऊस खोडकिडा’ कीटकाचे व्यवस्थापन या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटचे विषयतज्ज्ञ आर. बी. सुतगुंडी यांनी जमिनीचा कस व उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी हिरवळीचे खत वापरण्याचा आणि जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढविण्याचा सल्ला दिला. तसेच हुमणी अळीच्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींची माहिती दिली.

ऊस विभागाचे महाव्यवस्थापक श्यामराव बिर्जे हे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. हिरेबागेवाडी, खानापूर व एम. के. हुबळी विभागातील ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. मुख्य वित्त अधिकारी प्रदीपकुमार इंडी यांनी संस्थापक अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याकडून शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस बियाणे, रोपे व खते पुरविण्यात येत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा ऊस पुरवून कारखान्याच्या प्रगतीस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel

जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य व जिल्हा कृषिक समाजाचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी कार्यशाळेचे कौतुक केले. नोव्होनेसिस इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी उदाप्पा पुजारी, गोभूमी बायो-ऑरगॅनिक फर्टिलायझर इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी अल्ताफ व महबूब, प्रगतशील शेतकरी बाबू कट्टी, बद्रीनाथ कुलकर्णी, ईश्वर जमखंडी, रवी शिद्दल, अजित हट्टीहोळी, बसनगौडा पाटील, करिबसप्पा चिन्त्रप्पागौडा, मुशप्पा हट्टी तसेच कारखान्याचे अधिकारी रवी इटगी, राजेश भुसन्नवर आदी उपस्थित होते. निंगेश नायक यांनी सूत्रसंचालन केले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here