महाराष्ट्र : गाळप लवकर सुरू केल्यास ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे मोठे नुकसान, राजू शेट्टी यांचा आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : राज्य सरकारने चालू वर्षीचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे मोठे नुकसान होणार आहे. राज्यातील साखर कारखाने १५ ऑक्टोबरला सुरू केल्यास उसाच्या वजनात आणि रिकव्हरीमध्ये मोठी घट होणार आहे.

साधारणपणे १ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना किमान प्रति टन ५०० रुपये अनुदान देण्याची घोषणा करावी, तरच १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करू देऊ, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel

राजू शेट्टी म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल न घेता आणि कोणत्याही भरपाईची घोषणा न करता हा निर्णय जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास, स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखाने सुरू करू देणार नाही आणि रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या दरम्यान उसाची सरासरी रिकव्हरी अवघी ८ ते ९ टक्के असते. १५ डिसेंबरनंतर थंडीचा कडाका वाढल्यानंतर उसातील साखर रिकव्हरी वाढण्यास सुरुवात होते. अशा स्थितीत जर कारखाने ऑक्टोबरमध्येच सुरू केले, तर कमी रिकव्हरीचा ५० ते ६० टक्के ऊस गाळप झालेला असेल.

सध्या देशात साखरेचा साठा अपुरा असल्याचा बहाणा करून केंद्र सरकारने लवकर साखर कारखाने लवकर सुरू करण्याचा हा निर्णय घेतला आहे. काही मोजक्या साखर कारखानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारला चुकीची आकडेवारी देऊन फसवले आहे. देशात कुठेही साखरेची टंचाई नसून, नोव्हेंबरपर्यंत सर्व देशाचा विचार करता पुरेसा साखर साठा शिल्लक आहे. केंद्र सरकार साखर कारखान्यांवर धाडी टाकून साखर साठा तपासत नाही. उलट छोट्या दुकानदारांवर कारवाई करून त्रास दिला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here