कोल्हापूर : येथील देशभक्त आणखी १०० रुपये याप्रमाणे अतिरिक्त रत्नाप्पाण्णा कुंभार लिज युनिट श्री रेणुका शुगर्स या साखर कारखान्यातर्फे २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रतिटन १०० रुपये अतिरिक्त जमा केले. ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले, ‘२०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्याने एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३५१८ रुपये याप्रमाणे ऊस बिलाची रक्कम आदा केली आहे. त्यानंतर आता प्रतिटन रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.
ते म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला चांगला दर मिळावा तसेच त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील आहे. परिसरातील इतर कारखान्यांच्या तुलनेत ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याचा कारखान्याचा प्रयत्न आहे. येत्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी संपूर्ण ऊस रेणुका शुगर्स कारखान्यास गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


















