सोलापूर : माढा तालुक्यात पावसाची दडी, ऊस पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान

सोलापूर : माढा तालुक्यात तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. केवड, उंदरगाव, जामगाव, मानेगावसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा दीर्घ खंड जाणवत आहे. खरिपाच्या पिकांसह ऊसशेतीवरही त्याचा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार काही भागांत ५० ते ६० टक्क्यांपर्यंत शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाअभावी उसाची वाढ खुंटली असून, जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी करपलेल्या उसातच जनावरे सोडत आहेत. काही ठिकाणी ऊस वाचण्याची शक्यता नसल्याने रोटावेटर फिरवून उभा ऊस मोडून टाकावा लागत आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली ऊसशेती करपू लागली असून, करपलेल्या उसाच्या शेतात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उपलब्ध पाण्यावर पिके वाचविण्याची धडपड सुरू असली तरी पाणीसाठे कमी होत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

दरम्यान, माढा तालुक्यातील पर्जन्यमापकाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत असल्याचा प्रश्न यापूर्वीही उपस्थित करण्यात आला होता. जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी कृषी विभागाने पर्जन्याच्या अचूक नोंदींची माहिती वरिष्ठ कार्यालय व शासनाकडे तातडीने पाठवावी, अशी मागणी केली होती. तसेच माढा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शिफारस करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. ऊस पिकाच्या परिस्थितीबाबत, केवड येथील शेतकरी सुभाष लटके यांनी सांगितले की, “तीन महिने झाले पाऊस आला नाही. त्यामुळे ऊस वाळून चालला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपाशी मरण्यापेक्षा मुक्या जनावरांना शेतात चारलेले चांगले. शासनाने तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसानभरपाई दिली पाहिजे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here