सांगली : श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी शंतनू सगरे, उपाध्यक्षपदी दीपकराव ओलेकर

सांगली : श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी युवा नेते शंतनू सगरे, तर उपाध्यक्षपदी दीपकराव ओलेकर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या देखरेखीखाली निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे सगरे गटाचे तिसरे वारसदार म्हणून शंतनू सगरे यांची महांकाली कारखान्यात अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली जाणार आहे. महांकाली कारखान्याच्या निवडणुकीत महांकाली शेतकरी विकास पॅनेलने १७ पैकी १७ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी शंतनू सगरे, तर उपाध्यक्षपदासाठी दीपकराव ओलेकर यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

महांकालीच्या राजकारणात सगरे कुटुंबाचा प्रभाव राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शंतनू सगरे यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही सगरे गटाच्या पुढील राजकीय व सहकारातील नेतृत्वाची नवी दिशा मानली जात आहे. निवडीनंतर माजी अध्यक्ष अनिता सगरे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालकांनी नूतन अध्यक्ष शंतनू सगरे व उपाध्यक्ष दीपकराव ओलेकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी संचालक जीवन भोसले, सुहास पाटील, सागर पाटील, मोहन खोत, भीमराव कोळेकर, प्रकाश पाटील, संभाजी पवार, कुमार पाटील, काशिलिंग कोळेकर, अरविंद स्वामी, दीपक चव्हाण, अनुराधा सगरे, छाया पाटील, निखिल बनसोडे उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here