अहिल्यानगर : पारनेर कारखाना विक्री प्रकरणाच्या चौकशीला गती, चोरडिया बंधूंना चौकशीसाठी नोटीस

अहिल्यानगर : देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग आला आहे. दैनिक ‘प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, पारनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू असून पुण्याचे उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडिया या बंधूंची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. न्यायालयीन आदेशानंतर तपास पुन्हा सुरू झाला आहे. पारनेर पोलिसांनी चोरडिया बंधूंना पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याच्या नोटिसा बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या प्रकरणातील नऊ आरोपींच्या बँक खात्यांवर सुमारे २३ कोटी रुपये पाठविल्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून निधीचा स्रोत, संबंधित बँक व्यवहार आणि कारखाना खरेदीतील आर्थिक साखळी तपासावी, अशी मागणी कारखाना बचाव समितीने केली आहे.

कारखाना बचाव समितीचे अॅड. रामदास घावटे यांनी विविध मुद्यांवर चौकशीसाठी पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडे निवेदन दिल्याचे सांगितले. बचाव समितीने दिलेल्या माहितीनुसार, लिलावात कारखाना खरेदी करण्यासाठी चोरडिया बंधूंनी पुण्याचे माजी खासदार विदुरा नवले यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या नऊ आरोपींच्या खात्यांवर सुमारे २३ कोटी रुपये पाठवले. संबंधित रक्कम क्रांती शुगर कंपनीत गुंतवण्याऐवजी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पाठविण्यात आल्याचा समितीचा आरोप आहे. या व्यवहाराच्या माध्यमातून क्रांती शुगर कंपनीसाठी कारखान्याची मालमत्ता खरेदी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. चोरडिया बंधूंनी दिलेली रक्कम म्हणजे कर चुकवेगिरीतून मिळवलेला काळा पैसा असल्याचा आरोप समितीने केला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here