कोल्हापूर : ‘गोडसाखर’चा बुधवारी बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम, २६ ला वार्षिक सभेचे आयोजन

कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम बुधवारी (ता. २३) सकाळी नऊला, तर कारखान्याची वार्षिक सभा शनिवारी (दि. २६) दुपारी एकला आयोजित केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे अध्यक्षस्थानी असतील. अध्यक्ष प्रकाश पताडे व ज्योत्स्ना पताडे यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन होईल. संचालक शिवराज पाटील व दीपा पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा होईल. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण अध्यक्षस्थानी असतील.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी केले आहे. शनिवारी (ता. २६) होणाऱ्या कारखान्याच्या वार्षिक सभेसमोर नऊ विषय सहसंचालकांच्या आहेत. प्रादेशिक (साखर) अध्यक्षतेखाली स्थापित समितीद्वारे ई-ऑक्शन पद्धतीने केलेल्या स्क्रॅप व भंगार विक्रीला कार्योत्तर मंजुरी देण्यासह, ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे आदी विषयांचा समावेश आहे. सभेला सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here