लातूर : दुष्काळी परिस्थितीमुळे संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे साध्या पद्धतीने बॉयलर अग्नीप्रदीपन; ११ ऑक्टोबरला गळीत हंगामास प्रारंभ

लातूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत उभारण्यात आलेल्या संत श्री गोपाळ बुवा महाराज शुगर अँड अॅग्रो फूड इंडस्ट्रीज प्रा. लि. साखर कारखान्याच्या दुसऱ्या बॉयलरचे अग्नीप्रदीपन १७ सप्टेंबर रोजी साध्या पद्धतीने करण्यात आले. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने घेण्यात आला. कारखान्याचा गळीत हंगाम येत्या ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन राजेश कराड यांनी दिली.

राजेश कराड म्हणाले, मागील गळीत हंगामात कारखान्याने १ लाख ३५ हजार टन उसाचे गाळप केले. यंदाच्या हंगामासाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली असून कारखाना गाळपासाठी सज्ज आहे. यंदा ११ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३१५१ रुपये, १ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यानच्या उसाला ३२५१ रुपये, तर १५ जानेवारीनंतर गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३३५१ रुपये दर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून २८०० रुपये दिले जाणार असून उर्वरित रक्कम दोन टप्प्यांत अदा करण्यात येणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जाहीर केलेल्या दरात वाढ केली जाईल; मात्र जाहीर केलेला दर कोणत्याही परिस्थितीत कमी केला जाणार नाही, अशी ग्वाही कराड यांनी यावेळी दिली. बॉयलर अग्नीप्रदीपनाचा विधी प्रवर्तक तुळशीराम अण्णा कराड, प्रगतिशील शेतकरी काशीराम नाना कराड, कौशल्या कराड, चेअरमन राजेश कराड, शुभांगी कराड, रणवीर कराड आणि देव कराड यांच्या हस्ते करण्यात आला. त्यापूर्वी बालासाहेब तात्या कराड व आशाताई कराड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे भागधारक, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here