सांगली : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडे २०२५-२६ गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस पुरवठ्याच्या टनेजनुसार प्रतिटन अर्धा किलो साखर सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत कारखाना कार्यस्थळी ‘साखर वाटप केंद्रा’चा शुभारंभ करण्यात आला. आरग (मोहननगर) येथील कारखाना कार्यस्थळी संचालक अशोकराव वडगांवे, बाहुबली पाटील यांच्यासह संचालकांच्या उपस्थितीत तज्ज्ञ संचालक शालिवाहन मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते साखर वाटपाचा प्रारंभ करण्यात आला.
कारखान्याकडे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या ऊस टनेजनुसार मिळणारी साखर कारखाना कार्यस्थळावरून घेऊन जावी, असे आवाहन अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी केले आहे.साखर वाटप केंद्र सुटीचे दिवस वगळता दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी दिली. यावेळी परशराम चव्हाण यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



















saglyat kami rate diyavar 1kg sakhar deun pn kahi upyog nahi