संगम सहकारी साखर कारखान्याचे ५.४० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष राजेंद्र पाटील

बेळगाव (कर्नाटक): गत हंगामात संगम सहकारी साखर कारखान्याने ११.८२ टक्के उताऱ्यासह २.०६ लाख टन ऊस गाळप करून २.४४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. आगामी गळीत हंगामात ५.४० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली. कारखान्याच्या सभागृहात आयोजित वार्षिक सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, कारखान्याची सध्याची दररोज २,५०० मेट्रिक टन ऊस गाळपाची क्षमता असून ती ५ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढविली जाणार आहे. वीज निर्मितीची क्षमता ८ मेगावॅटवरून १४ मेगावॅट केली जाणार आहे. नवीन इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन केले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी १६६.५८ कोटी रुपये, तर इथेनॉल प्रकल्पासाठी १६०.१९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ते म्हणाले, कारखान्याने शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या तुलनेत अधिक दर देऊन ऊस बिलाची रक्कम वेळेत आदा केली आहे. कारखान्याच्या कर्जावरील व्याजापोटी १२४.७१ कोटी रुपये, तर ४९.५६ कोटी रुपये मुद्दलाची रक्कम आदा करण्यात आली आहे. कारखान्याच्या विकासासाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि संबंधितांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. उपाध्यक्ष बसगौडा पाटील यांनी स्वागत केले. व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. अणप्पा अक्कतंगेरहाळ्ळ यांनी सूत्रसंचालन केले. दुरदुंडी भरमगौडा यांनी आभार मानले. सभेस संचालक अर्जुन पाटील, अमरनाथ महाजनशेट्टी, सुभाष पाटील, संपत भांदुर्गे, सुनील पर्वतराव, सिद्धलिंगय्या रतभरम, संगीता करगुप्पी, राजश्री कवटगीमठ, शांतादेवी तवंगमठ, महादेव शिंगे, शिवाप्पा गस्ती, लगमण्णा केंपमलकरी, गिरीश मिश्रिकोटी, व्ही. एस. देसाई आदींसह सभासद उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here