सातारा : गुडगुंटी शुगर्सच्या सहकार्याने प्रतापगडचे व्यवस्थापन कार्यरत – अध्यक्ष सौरभ शिंदे

सातारा : भविष्यात प्रतापगड स्वयंपूर्ण व्हावा त्यादृष्टीनेच कर्नाटक येथील गुडगुंटी शुगर्सच्या सहकार्याने प्रतापगडचे व्यवस्थापन कार्यरत आहे, यंदाचा हंगामात चार लाख मेट्रिक टन उस गाळपाचे कारखान्याचे उद्दिष्ट असून, कारखान्याला जास्तीतजास्त ऊस देऊन आगामी गळीत हंगाम यशस्वी करावा, असे प्रतिपादन प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष व जावळीचे सभापती सौरभ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. गुडगुंटी-प्रतापगड शुगर्स अँड बायोएनर्जीजच्या माध्यमातून सन २०२६-२७ या गळीत हंगामासाठी बॉयलर प्रदीपनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कारखान्याच्या माजी अध्यक्षा सुनेत्रा शिंदे, गुडगुंटी शुगर्सचे अध्यक्ष वीरूपक्षय्या गुडगुंटी, संचालिका आशादेवी गुडगुंटी, कीर्ती गुडगुंटी, प्रतापगडचे उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव मर्डेकर, राजेंद्र भिलारे, मुख्य व्यवस्थापक रवींद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. संचालक राजेंद्र फरांदे-पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रतापगड कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here