सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर आणि करकंब हे दोन्ही युनिट आगामी ऊस गळीत हंगामासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही ठिकाणी गव्हाणपूजन आणि मोळी पूजन मोठ्या उत्साहात झाले. गुरुवारी पिंपळनेर येथे झालेल्या कार्यक्रमात संचालक विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते गव्हाण पूजन व शिवाजी पाटील, रामचंद्र अडसुळ, लक्ष्मण घोडके, सुदन मोरे, कैलास डोके यांच्या हस्ते मोळी पूजन करण्यात आले. गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाल्याची आणि अधिकाधिक ऊस गाळपासाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारखान्याच्या युनिट नं. २, करकंबकडील गव्हाण व मोळी पूजन सतिश गोडसे, नारायण भारती, सतिश मिसाळ, ईश्वर बागुल व दादासाहेब पवार यांच्या हस्ते झाले. संचालक पंडितराव पाटील व नंदाताई पाटील व संचालक अशोक मिस्कीन व भाग्यश्रीताई मिस्कीन यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा पार पडली. या कार्यक्रमाला अमृताताई शिंदे, पोपट गायकवाड व्हाईस चेअरमन, संचालक रमेश येवले-पाटील, पोपट चव्हाण, राजेश खोत, विलास कौलगे, सचिन देशमुख, संजय लोकरे, जितेंद्र गायकवाड, लाला मोरे, कैलास तोडकरी, राजाराम नाळे, राजाराम थोरात, श्रीकांत पाटील, पांडुरंग घाडगे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे आदी उपस्थित होते.


















