नांदेड : भाऊराव कारखान्याची वार्षिक सभा उत्साहात, गाळप क्षमता १० हजार मे. टनापर्यंत वाढवण्याची घोषणा

नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. या सभेला कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेत १५ ठरावांवर चर्चा करून ते एकमताने मंजूर करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी केले. येत्या दोन वर्षांत कारखान्याच्या दोन्ही युनिटची गाळप क्षमता वाढविण्यात येणार असून, दररोज १० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येईल. कारखान्याने सदैव शेतकरी व सभासदांचे हित आणि विश्वास जोपासला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस इतर कारखान्यांना देऊ नये, असे आवाहन खासदार चव्हाण यांनी यावेळी केले.

सभेत आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले, येत्या काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. इसापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पाच पाणीपाळ्या मिळण्याची शक्यता असून, पहिले आवर्तन ऑक्टोबर महिन्यात सोडण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच त्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहितीही दिली. यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर, श्रीजया चव्हाण, माजी अध्यक्ष गणपतराव तिडके, बँकेचे संचालक बी. आर. कदम, बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी सभापती किशोर स्वामी, संचालक व्यंकटराव कल्याणकर, साहेबराव राठोड, व्यंकटराव साखरे, मोतीराम जगताप, बळवंतराव इंगोले आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here