लातूर : साईबाबा शुगरच्या थकीत ऊसबिलप्रश्नी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

लातूर : तगरखेडा (ता. निलंगा) येथील साईबाबा शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला आहे. मात्र दुसरा हंगाम आला तरी अद्याप उसाचे पैसे दिले नसल्याने, सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला शेतकऱ्यांनी आहे. तगरखेडा येथील बालाजी पाटील, भरत मोरे, बाबुराव वलांडे, माधव बेलोरे, सुरेश थेटे, भगवान थेटे, प्रवीण थेटे आदी शेतकऱ्यांनी सात दिवसांच्या आत रक्कम दिली नाही तर सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असे लेखी निवेदन उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा यांना दिले आहे. याचबरोबर शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याची घोषणा यावेळी केली.

याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबा शुगरने गेल्या हंगामात ऊस नेला होता. आता दुसरा गळीत हंगाम आलेला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पूर्णतः गारद झालेला आहे. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मानसिक आधार दिलेला आहे. मात्र गोंद्री येथील साईबाबा शुगर कारखाना शेतकऱ्यांच्या घेतलेल्या उसाचे पैसे द्यायला तयार नाही. कारखान्याचे शरण राजेश्वर पाटील व गणेश पाटील यांनी जानेवारी ते मार्च यांदरम्यान तगरखेडा येथील साधारणतः २० ते २५ शेतकऱ्यांचा ऊस घेऊन गेलेला आहे. आता साधारणतः सात महिन्याचा कालावधी लोटला आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर व चेअरमन यांच्या घरी अनेक वेळा हेलपाटे मारलेले आहेत. काही शेतकऱ्यांना थोडी बहुत रक्कम अदाही केलेली आहे. तर काहींना एकही रुपया दिलेला नाही. ही रक्कम तातडीने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here