पुणे : श्री संत तुकाराम कारखान्याकडे ४ लाख १६ हजार टन गाळपास उपलब्ध, हंगाम सुरू

पुणे : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या २९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ शनिवारी झाला. भागवताचार्य संतोष महाराज पायगुडे व त्यांच्या पत्नी स्मिता पायगुडे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन झाले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले, उपाध्यक्ष अनिल लोखंडे आदी प्रमुख उपस्थित होते. गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू करण्यासाठी कारखान्याच्या गाळप क्षमतेनुसार ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेशी करार करण्यात आले आहेत. शासनाच्या धोरणानुसार गळीत हंगाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी दिली. यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे ५ हजार २०३ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंद झाली असून, त्यातून सुमारे ४,१६, २८८ टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

कारखान्याची आर्थिक वर्ष २०२५ २६ ची ३७ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २९) सकाळी ११ वाजता वाकड-हिंजवडी रस्त्यावरील द्रौपदा लॉन्समध्ये होणार आहे. अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या अध्यक्षतेखाली सभा होईल. संचालक माउली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, धैर्यशील ढमाले, धोंडिबा भोंडवे, राजेंद्र कुदळे, दत्तात्रय उभे, माजी संचालक वसंतराव साखरे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक चेतन भुजबळ यांनी आभार मानले. प्रभारी सचिव एम. टी. काळोखे, मुख्य अभियंता आर. बी. जगदाळे, चीफ केमिस्ट एस. डी. शिरसाट, मुख्य शेतकी अधिकारी ए. व्ही. सावंत, प्रभारी चीफ अकाउंटंट एस. दाभाडे, डिस्टिलरी इन्चार्ज एस. पी. पवार, प्रभारी ऊस पुरवठा अधिकारी एच. के. गोपाळे व लेबर ऑफिसर ए. पी. देशमुख आदींचीही उपस्थिती होती.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here