कर्नाटक : उसाला प्रतिटन ६,००० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनांची मागणी

बेळगाव : जिल्ह्यात ऊस गळीत हंगाम सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. मात्र, अद्याप उसाचा दर निश्चित झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना ऊस दराविषयी निवेदन दिले. यंदा, गळीप हंगाम २०२६-२७मध्ये उसाला प्रतिटन सहा हजार रुपये दर निश्चित करून साखर कारखाने तातडीने सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली. साखर आयुक्त, साखर कारखानदार आणि साखर मंत्र्यांची तातडीने बैठक घेऊन उसाला न्याय्य व लाभदायक दर निश्चित करावा. विलंब न करता साखर कारखाने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष गणेश ईळिगेर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या पाणी टंचाईची स्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी शेतातील ऊभा ऊस पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याबरोबरच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. दर निश्चित करण्यास विलंब झाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here