सातारा : सह्याद्री कारखाना प्रतिदिन ११ हजार मे. टन ऊस गाळप करणार, हंगामासाठी यंत्रणा सज्ज

सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामासाठी जय्यत तयारी केली आहे. कारखान्याची गाळप क्षमता मागील हंगामात प्रतिदिन ७५०० मेट्रिक टनांवरून ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवली. विस्तारीकरणामुळे कारखान्याची गाळप क्षमता व कार्यक्षमता वाढली असून, त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. माजी सहकार व पणन मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने यंदाच्या गळीत हंगामासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. यंदा दररोज ११ हजार मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळप करण्याचे नियोजन असल्याची माहिती कारखाान्याच्या सूत्रांनी दिली.

कारखाना कार्यस्थळावर वाढीव गाळप क्षमतेच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणाही कार्यस्थळावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. ऊसतोडणी-वाहतूक यंत्रणा संबंधित विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात बसविण्याचे काम सुरू असताना यशवंतनगर विभागीय कार्यालयप्रमुख वाय. पी. साबळे, फिल्डमन एम. एच. मोरे, एस. वाय. पवार, संजय चव्हाण, डी. जी. सरगडे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पाटील, वायदंडे, आतकरे आदी उपस्थित होते. यंदा अधिक क्षमतेने ऊस गाळप करण्यासाठी ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यात आली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा नोंदविलेला ऊस वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने कारखान्यात आणण्यासाठी विभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here