धाराशिव : तांदूळवाडी (ता. वाशी) येथील शिवशक्ती-भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडच्या यंदाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन कार्यक्रम चेअरमन अनिल सावंत व व्हाइस चेअरमन विक्रम ऊर्फ केशव सावंत यांच्या हस्ते झाला. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा ऊस उपलब्धतेचे आव्हान निर्माण झाले असतानाही कारखान्याने दोन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले.
सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन अनिल सावंत यांनी केले. यावेळी नागनाथ नाईकवाडी, विकी चव्हाण, शिवहार स्वामी, बाळासाहेब मांगले, सतीश शेरकर, विकास तळेकर, हर्षल उंदरे, प्रकाश शेटे, सुनील जाधवर, दत्ता तोडकर, उद्धव साळवी यांच्यासह शेतकरी, ऊसतोडणी ठेकेदार, पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब मांगले यांनी केले. आभार शिवहार स्वामी यांनी मानले.


















