पुणे : दौंड शुगरमध्ये बॉयलर अग्निप्रदीपन, यंदा १८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – संचालक वीरधवल जगदाळे

पुणे : आळेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर कारखान्याच्या १८ व्या गळीत पूजनाचा कार्यक्रम नुकताच झाला. मागील गळीत हंगामात कारखान्याने १५ लाख ७९ हजार २२८ मेट्रिक टन ऊस गाळप करून १२ लाख ९४ हजार साखर पोती तयार केली, तसेच ११.३४ टक्के सरासरी साखर उतारा मिळविला. एफआरपी ३,०४९.९६ रुपये प्रतिटन असताना कारखान्याने ३,२०० रुपये प्रतिटन दराने एकूण ४७०.३४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले. कारखान्याने आगामी २०२६-२७ गळीत हंगामात १८ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसदर देण्याच्या दृष्टीने कारखाना प्रयत्नशील राहणार आहे. लवकरच प्रत्यक्ष ऊस गाळपास सुरुवात होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.

जगदाळे यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील नोंद झालेल्या सर्व उसाचे वेळेत गाळप करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बिगरनोंदीचा ऊसही गाळपास घेतला जाणार आहे. कारखाना एफआरपीपेक्षा जादा ऊसदर देणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ऊस वजनातील अचूकता, पारदर्शकता आणि शेतकरीहिताला प्राधान्य देण्याची भूमिका कारखान्याने कायम ठेवली आहे. वेळेत ऊस पेमेंट देण्याची परंपरा यापुढेही कायम राहील. शेतकऱ्यांनी दौंड शुगर कारखान्यास गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस द्यावा, असे आवाहन जगदाळे यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here